मन आनंदी ते झाले

मन आनंदी ते झाले
ऊल्हासाने फडफडले
गरुडपंख ते ऊलगडले
मोद लेऊन सळसळले
ना ते दिसले
तरी प्रकटले
मंद लहरले
ऊसळे जल्लोश कारंजे
मन आनंदी ते झाले

रुप सूर्याचे ते गोजिरे
लोभस सुरेखच भासे
किरणांत जग लपेटले
सोनेरी पिवळे झाले
साजिरेच ते
तेजोमय ते
चैतन्यच ते
स्वप्न जणु अवतरले
मन आनंदी ते झालें

मन आनंदी ते झाले
ऊंच ऊंच मग ते गेले
नभस्पर्श मुलायम झाले
मन हलके फुलके झाले
तन हे झिंगले
दु:ख विसरले
तृप्तच झाले
सुहास्य वेडे नभी ऊधळे
मन आनंदी ते झाले

हसतच जाऊ सामोरे
सुख दु:ख असे काहीही
सदाचार ना तो सांडे
सत्याची कास धरू रे
राग कशाला
जे नशिबाला
ते वाट्याला
भरारीच ती यशाकडे
मन आनंदी ते झाले

न्याय दैवी अजबच ते
असूया नसे खंत नसे
अंतर मग का वाढते ?
सावरता ना सावरते
फळ श्रध्देचे
निश्चित पावे
धैर्यची हवे
मग सुखद साद ती येते
मन आनंदी ते झाले