ही सगळी अपार्टमेंट फार सुंदर दिसतात
उंच उंच टावर अगदी आभाळात घुसतात छिनाल
बाईच्या नजरेने हलकेच खुणावतात
काचेच्या खिडकीने त्या चक्क डोळा मारतात
माझ्या सारखा भाबडा माणूस काहीसा भांबावतो
हलकाच टच करून भाव ऐकून पळून जातो
आता ह्यांचा भाव मोजू नये इतका
तिच्या मायला साला इतका कोठून आणायचा पेंका …?
पूर्वी घरे कशी आपली साधी-सुधी होती
साध्या-सुध्या आईसारखी खरंच सरळ सरळ होती
लाललाल कौलांवरती आभाळ ओठंगत होते
कधी कधी पक्षी बनून छानछान गात होते
ऐन तारुण्यात तर घर अगदी मस्त मस्त होते
साडीमधल्या बायकोसारखे मस्त असं फुलून होतं
खिडकीतून दिसणाऱ्या सुंदर निळ्या आभाळाचे
धमाल असं गाणं होतं
आता ही घरे सगळी कमर्शियल झाली
बाईच्या दिसणाऱ्या उघड्या बेंबीसारखी निर्लज्ज झाली
फ्रेंच विंडोमधून सगळे काही दिसते
आमचे साधे सुधे मन उगाच कावून जाते ....