बाजार आज भरला

येथे कशाकशाचा बाजार आज भरला
ज्याच्या खिशात पैसा त्याचा रुबाब दिसला
बाजार बाजरीचा आता दिसे न कोठे
ऊंची महाग वस्तू बाजार पूर्ण सडला
केशर डबीत आता कोथिंबिरीस जागा
गगनास भाव भिडले जगणेच प्रश्न बनला
सत्त्यास भाव नाही घेणार कोण त्याला ?
जगती कसे जगावे? सत्त्यास प्रश्न पडला.
बजार प्रांगणी का न्यायलयात गर्दी ?
विकतात फैसले ते जगतात न्याय हरला
सरकार हाकणारे बाबू तिथे कडेला
विकती इमान सारे बघ तो दलाल हसला
निष्पक्ष अश्व विकती किमया इथेच घडली
बहुमत नसून नेता सिंहासनात बसला
श्रीमंत धेन्ड त्यांचे कळे बघून धंदे
ओजात दैत्य सजले तिमिरात देव लपला
"निशिकांत" का स्वत:ला हर्रास व्यर्थ केले ?
श्रीमान सत्त्यवादी कवडीस आज विकला

निशिकांत देशपांडे मो.नं. 98907 99023
E MAIL: दुवा क्र. १
प्रतिसादाची प्रतिक्षा