(घर)पोच

(मा. मिलिंदरावांची माफी गृहित धरुन)

मस्त खातो, मानही घेतोच आहे

मी असा माजूनही तगतोच आहे

मीच हाणले मस्त कोट्यातील माझ्या

कंपनी चा बघ डमी खपतोच आहे

टोमण्याचा नूर काही और आहे

वाहिनी-वृत्तांत बघ बकतोच आहे

का मला कमिटीत आसनही नसावे?

फेकला गेलो परी मी तोच आहे

चौकशा कित्येक आल्या आणि गेल्या

बासनी त्या अहवाल सडतोच आहे

बेगडी आयोगही फुसकाच ठरला

माल बघ सारा घरपोच आहे