तेजोमय हे विश्व असावे तुमच्या साठी
नवसंवत्सर उत्सव व्हावे तुमच्या साठी
लाख उजळत्या दीपा पॅकी एक दिव्याने
नंदादीपासम तेवावे तुमच्या साठी
श्रावण राहो हिरवा हिरवा खळखळणारा
वेल फुलांना रंग मिळावे तुमच्या साठी
केशर लाली सांज सकाळी तुमची आहे
ईशाने झोळीस भरावे तुमच्या साठी
केशव माधव तीनत्रिकाळी संध्या करता
पुण्य प्रभावे भाग्य हसावे तुमच्या साठी
सुखदु:खाची खिचडी आहे जीवन सारे
दु:ख नसावे मोर झुलावे तुमच्या साठी
स्वप्नाविन का जगतो कोणी आज जगी या?
स्वप्न न आता स्वप्न उरावे तुमच्या साठी
दार किलकिले करून ठेवा कातरवेळी
घेउन किरणे म्हणतो यावे तुमच्या साठी
"आनंदी आनंद" अवस्था "निशिकांताची"
सप्तसुरांनी झंकारावे तुमच्या साठी
शुभेछुक: निशिकांत आणि जयश्री देश्पांडे
मो.न. 98907 99023
E Mail दुवा क्र. १
प्रतिसादाची प्रतिक्षा