असे होते का?

रोजचे जीवन जगताना अशा काही मजेशीर गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतात का?

१. आपण कोठेही पैसे भरायच्या रांगेत उभे असताना आपल्या पुढच्या व्यक्तीला अकारण खूपच वेळ लागतो आणि दुसरी रांग भराभर पुढे जाते.

२. नवीन म्हणून एखादी डिश मागवली तर ती अतिशय बेकार निघते आणि नेहेमीचेच खाणे बरे असे वाटायला लागते.

३. झोपेत असताना आपण पाय घसरून पडतोय असे वाटते आणि जोरात दचकायला होते.

४. काहीकाही गोष्टी उगाच आपल्या हातातून पडतात किंवा परत उचलल्या तरी निसटतात. 

५. एखादी वस्तू आत्ता इथेच ठेवली होती असे म्हणत असताना ती अजिबात दिसत/सापडत नाही.

६. खूप दिवस सातत्याने एखादी मालिका बघत असू तर त्याचा महत्त्वाचा किंवा अंतिम भाग चुकतो.

७. कोणाच्या तरी मरणाची बातमी आधीच जाणवते.

८. आवडत्या गाण्याचे कडवे ते सुरू व्हायच्या आधीच गावे तर भलतेच कडवे सुरू होते. (माझ्या परिचयातले असे होण्याला 'गल्ली चुकली' म्हणत!)

अंजू