प्रकाश स्वप्ने..

प्रकाश स्वप्ने पहात होतो..

तरिही खितपत रहात होतो!
अनुरागाला समजून ओझे..
व्यथा उगा मी वहात होतो!
हाता वरची जीवन रेषा..
कोठे सरते पहात होतो..
स्वप्न कोवळे.. केविलवाणे..
नियमाने मी पहात होतो!
पुन्हा तुझे हे जवळून जाणे..
लांब जरी चार हात होतो..
-- बहर.