श्वान सांगे लेकराला जीवनी कैसे जगावे
पाळले, मोकाट जे पण श्वान आपण हे स्मरावे
शेपटी हलवून जगतो घोळतो गोंडा जरी रे
तुज कधी मंत्रीपदाचे स्वप्नही नेत्री नसावे
जात नाही गोत्र नाही बंधने नसली तरी पण
पुज्य मादी! मानवासम तू बलत्कारी न व्हावे
ध्यान योगासन कशाला? चोचले ते मानवाचे
पोट भरण्या भटकताना ना कधी बाळा थकावे
संस्कृतीची मानवा का वाजवी टिमकी उगा तू?
जाणतो ईमान आम्ही जे तुला नवखे असावे
श्वान जाती लागते तुज भांडता देण्या शिव्या का?
आमुचा अपमान होतो मानवा तू ओळखावे
भुंकणे ऐकून भो भो धावता तिकडे कळाले
आपला परिवार दिसण्या संसदे मध्ये बघावे
कायदे कानून त्यांचे मान्य ना आम्हा कदापी
भूक खळगीची भराया शील का कोणी विकावे?
जे कधी "निशिकांत" घडले शोक का त्याचा करावा?
बाळ! श्वानांनी खुशीने मॉत कुत्र्याची मरावे
निशिकांत देशपांडे मो न ९८९०७ ९९०२३
E Mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा