मी विस्कटल्या खोलीत मनाच्या..

मी विस्कटल्या खोलीत मनाच्या बसतो..

पडतात कवडसे.. त्यांना पाहून हसतो..
ओंजळीत आहे पुरचुंडी स्वप्नांची..
ती घेऊन जेथे जागा मिळते बसतो..
देतात दिलासे ऋतुही जाता-जाता..
मी आता केवळ त्यांना पाहून हसतो..
गर्दीत मिसळतो.. गर्दी होउन जातो..
चालतो.. हासतो.. जातो येतो.. बसतो.
तू वचने दे.. आश्वासन, आणा-भाका..
मी निमुटपणाने त्यांच्यावर विश्वसतो..
शिषिरागम आहे, 'बहर' कोठुनी यावा?
स्वप्नांची पाने गळती.. वेचीत बसतो!
-- बहर.