तार मनाचे दे झंकारून

तार मनाचे दे झंकारून 
सूर शब्दांचे अलगत छेडून 
तार मनाचे दे झंकारून ....!!
भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ....!!
मेघ गर्जुनी करतील दाटी 
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!! 
मनफ़ुलांनी गंधीत वारा
दे दरवळूनी भावफ़ुलोरा
बोल अभय जे कानी येईल
तन्मयतेने घ्यावे ऐकून ....!! 
                                      गंगाधर मुटे
..........................................