थांबा मित्रानो मी पण शब्दांना थोडसे वळण लावणार आहे ..!!!

प्रथमच मी तुम्हाला अगदी मनातले सांगतो 
शब्दांना थोडेसे वळण मीपण लावणार आहे 
त्याना थोडासा धाक दाखवणार आहे 
थांबा मित्रानो मीपण शब्दांना थोडेसे वळण लावणार आहे 
 
माझे शब्द आहेत खेड्यातले गावंधळ  अडाणी 
ते लिहिता बोलताना  करतात आनी -पानी 
त्याना कसे बोलायचे लीवायचे शिकवणार आहे 
थांबा मित्रानो मीपण शब्दांना थोडेसे वळण लावणार आहे 
 
त्यांच्याकडून जोर बैठका मारून घेणार आहे 
मला जमेल तसे त्यांना जरा पौष्टिक खाऊ घालणार आहे 
त्यांच्या बोकांडी बसून हे सगळे करून घेणार आहे 
थांबा मित्रानो मीपण शब्दांना थोडेसे वळण लावणार आहे 
 
त्याना थोडेसे यौगिक क्रिया शिकवणार आहे 
त्यांच्याकडून थोडासा प्राणायाम करून घेणार आहे 
त्यांना  सडसडीत नि मस्त चपळ बनवणार आहे 
थांबा मित्रानो मीपण शब्दांना थोडेसे वळण लावणार आहे
 
तुमचे शब्द कशे छान छान नि गोंडस असतात 
माझे शब्द कशे मयखाण्यातून    जरी आले 
तरी पायखाण्यातून आल्यासारखे वाटतात 
आता  मी एकेका शब्दांना वळण लावणार आहे 
 
त्याना मी कोठल्यातरी कार्यशाळेत घालीन म्हणतो 
कार्यशाळा मला परवडेल की नाही तेवढे मला सांगा ..?
मी त्यांच्यासाठी म्युन्सिपालटीची शाळा शोधतोय 
तुम्ही मला शोधायला मदत करा ..
माझ्या शब्दाना थोडेसे वळण लावायचे म्हणतोय ........