अखंड आशा

कृष्ण शुक्ल पायांखाली चिरडित
सुमने काटे सुखदुःखांचे
संथ चालतो काल अखंडित
तमा न त्याला घटनांची ॥

नवप्रभाती नभी उजळती
रंग उषेचे गुलाबी नवे
नजरेपुढचे धुके निवारी
सूर्यवदन हे प्रसन्न हंसरे ॥

मनधेनुला नवीन पान्हा
नवआशेचे तरंग पुन्हा
असो धवल यश-आरोग्याचे
सर्वसुखाचे वरदान अम्हा ॥

- साऱ्या मनोगतींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.