तुला बघितलं की मन तृप्त झाल्यासारखं वाटतं,
तू दिसली नाहीस की रक्त आटल्यासारखं वाटतं,
तुला बघत राहावं अशी इच्छा नेहमीच असते मनात,
पण ती पूर्णं नाही झाली की वनात गेल्यासारखं वाटतं,
तू हसत राहावं हिच प्रार्थना नेहमी ईश्वराकडे करतो,
ते हसणं हरवलं की माझं मन रडल्यासारखं वाटतं,
तू बोलायला लागलीस की भर गर्दीत सुद्धा तुझाच आवाज येतो,
ते कानी नाही पडलं की पूर्णं दुनियेने मौन व्रत धरल्यासारखं वाटतं,
मी चुकलो की तू माझ्यावर रागावतेस,
पण त्याच्या पाठची भावना फक्त मलाच कळते,
तुझं नि माझं हळुवारपणे बोलणं वाऱ्यालाही कळत नाही,
पण तुझ्या प्रत्येक शब्दाचं लाऊडस्पीकर फक्त माझ्याच मनात वाजतं,
तुला बघितलं की सारं जग हरवल्यासारखं वाटतं,
खरंच तू दिसली नाहीस की रक्त आटल्यासारखं वाटतं...
- यशपाल पाटील (९९७००११८३९)