बघा जरा डोळे उघडून !!

एकलव्याचा अंगठा मागणारे महागुरू द्रोण
ज्यांनी एकलव्याला बनवले निर्बल
आणि जगायला लावले लाजिरवाणे
काळ गेला वेळ गेली
आता खूप द्रोण तयार झाले आहेत
ते अंगठा सोडून काहीपण मागतात
आणि एकलव्य आपले अंगठे[!!] शप्पत कापून देतात
बघा जरा डोळे उघडून ..
 
महाभारतातील धर्मराज  गेला काळाच्या पडद्याआड
आत्ता खूप धर्मराज  तयार झाले आहेत
परवाच एकाने स्वताच्या घरातले कपाट फोडून
पन्नास हजार रुपये ओतून आला बार  डान्समध्ये जाऊन
किती धर्मराज दिसतील आजूबाजूला
बघा जरा डोळे उघडून ..
 
द्रोपतीचे  वस्त्रहरण  करणारा दुर्योधन मरुन गेला 
आता किती तयार झालेत दुर्योधन
ज्यांचे शाब्दिक वस्त्रहरण चालूच आहे
आणि द्रोपदी हताश ,केविलवाणी
नि कृष्ण गायब आहे
बघा जरा डोळे उघडून ..
 
शकुनीमामा भाच्याच्या  बाजूने खेळला
आणि पाठवले पांडवाना  वनवासात
एक शकुनी मामा गेला नि बघा आजूबाजूला
किती शकुनीमामा दिसतात
बघा जरा डोळे उघडून
 
एका शिंप्याने राजाचे कपडे बनवले
नि नागडा फिरवला रस्ताभर
तो शिंपी गेला नि काळ पण गेला
आता किती शिंपी तयार झालेत ..
बघा जरा ....
 
हे सगळेच कठीण नि कठीण आहे
महाभारतापासून हेच घडतेय
सीतेला वनवास भोगायला लागला
येथे अनेक हुंडाबळी होताहेत
दुर्योधन नि शकुनी मामा रोज दिसताहेत
कधीतरी कृष्ण जन्म घेईल 
वाट बघतो आहे .....!!!