तुम्ही त्याला नास्तिक म्हणता
असेलही कदाचित तसा तो
देवाची पूजा करीत नसेल
नसेल डोळे मिटून प्रार्थना करीत
नसेल त्याला काही जमत
मंत्र .आरत्या स्तोत्रे अमुक नि ढमुक
एवढे तरी कबुल करा की तो भजत नसेल
तरी काही मागत तर नाही
देवापाशी ....
नाही करीत याचना
नाही तोंड वेंगाडत
एकटा लढतोय तो प्रसंगाशी
कर्तोयना दोन हात
त्याला शाबास तर म्हणा ...!!
जे करता भक्ती देवाची
आळवता त्याला
कशासाठी ?
तो असेल त्यांच्या पाठीशी
मग एवढा भक्तीचा गर्व [!!]
फसतोय बिचारा परमेश्वर भक्तीला
नि करून घेताय जे त्याचा उपयोग
पावसात छत्री म्हणून वापरतात
थंडीत स्वेटर म्हणून वापरतात
उन्हाळ्यात कूलर म्हणून वापरतात
संकटात ढाल म्हणून वापरतात
दुख्खात त्याच्या पदराआड लपता
नि दुसर्याला नास्तिक नि नास्तिक समजतात
हे कशासाठी...?
तो असेल नास्तिक
खरे म्हणजे जो लढतो
त्याची लढाई स्वतासाठी
अस्तित्वासाठी
अन्यायासाठी
दुर्बलासाठी
देव त्यांनाच मदत करतो
त्यांच्याच पाठीशी उभा राहतो ठामपणे ..!!