दैनंदिन जीवनातील गमती - जमती

दैनंदिन जीवनातील  गमती - जमती

बरेचदा आपण आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये इतके हरवून गेलेलो असतो, उगाचच वेगवेगळ्या चिंतांनी स्वतःहाला गुरफटून घेत असतो,  घरचं, ऑफिसचं टेन्शन घेऊन बसतो आणि  दैनंदिन जीवनात आपल्याही नकळत होणाऱ्या छोट्या छोट्या मजेदार गोष्टींकडे लक्षंच देत नाही.  याच छोट्या छोट्या मजेदार गोष्टी आपल्याला किती हसवू शकतात, चिंतामुक्त करू शकतात याची काही उदाहरण आता आपण पाहूया.

२० वर्ष लग्नाला झालेलं एक जोडपं.

पत्नी : काय हो आपल्या लग्नाला  २० वर्ष  झाली  तरी तुम्ही सारखे सारखे माझं हे- माझं  ते म्हणतं असता.   आता तरी आपलं घर, आपली मुलं, आपली गाडी अस म्हणतं जा.

दुसऱ्या दिवशी अंघोळ करून आल्यावर पती : अगं एकतेस का? आपला पायजमा कुठे ठेवला आहेस?    

----------

ज्यांच्या घरात लहान मुलं असतात, त्यांच्या घरातील संवाद.

मोठी माणसं लहान मुलांशी बोलताना - चला आता आपण खाऊ खाऊया...   चला आता आपण शुशू करूया.  

---------

सासूबाई : अगं सूनबाई पाहिलंस का, आभाळ किती भरून आलंय, धो धो पाऊस पडेल अस वाटत आहे.

सूनबाई : बरं झालं बाई, ५ मिनिटापूर्वीचं  मी  सगळे कपडे काढले.    

असो, असं म्हणतात की लहान मुलं एका दिवसात १००० वेळा हसतात, आणि म्हणूनच ती इतकी तरतरीत, प्रसन्नं असतात. सगळ्यांना हवीहवीशी वाटतात.

चला तर मग आता आपणही हसूया...