ते गाणे तिन्हीसांजेला
मन माझे फुलवून गेले
दूर मला माझ्या गावी
मज अलगद घेऊन गेले
त्या नदी किनारी
झाडांची हिरवी गर्दी
वळणारी पाउलवाट
किती वाटत होती आपुली
ती हवा मस्त होती
होती गाभुळलेली
मज आठवूनी गेले
ती तिन्हीसांजेची गाणी
तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा
तो नाद अनामिक येई
घंटीचा किणकिणनारा....!!
मन माझे मोहून जाई
मन भरून जाई माझे
ती बघून गुलबक्षीची फुले
त्या मत्त गंधाने
मन माझे झुलून गेले
त्या कळ्या शेंदरी बघोनी
मन माझे हरखुनी जाई
ते रंग फुलांचे बघुनी
मी खुळा होऊनी जाई
ते पक्षी गोजिरवाने
ते स्वर फुलवीत गेले
आभाळातील भिरी
नक्षी कोरून गेले
मज क्षणभर दिसून गेले
मन माझे हरवून गेले ......!!
ते गाणे तिन्हीसांजेला
मन माझे फुलवून गेले