काय म्हणजे, उगाच का?

बऱ्याचं वेळेला आपण अस काही बोलून जातो, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा हेच समोरच्याला कळत नाही. किंवा ज्याचा त्याने हवा तो लावून ध्यायचा... बरोबर ना??  कधी कधी आपण किती वायफळ गप्पा मारत असतो, त्याला न शेंडा ना बुढखा अस काहीस असतं, काय म्हणजे, उगाच का?

उदा. १. एखादा जुना मित्र/ मैत्रीण खूप दिवसांनी अचानक भेटते तेव्हाचा संवाद -> अरे वा, तू इथे कशी काय? पुण्यात कधी स्थायिक झालीस ? मी पण सध्या पुण्यातच आहे, ये ना कधी तरी घरी???  --> नुसतं म्हणायचं ये ना कधी तरी घरी. ना पत्ता द्यायचा, ना वेळ सांगायची येण्याची, काय म्हणजे असं, उगाच का ?? काय साध्य होत यातून ?? 

उदा. २.  छान नवीन ड्रेस घालून आपल्याला जेव्हा आपली मैत्रीण भेटते, तेव्हा आपण काय म्हणतो -" छान ड्रेस आहे" म्हणजे इथे आपल्याला नक्की काय म्हणायचं असतं? फक्त - ड्रेस छान  आहे/ तुला हा ड्रेस छान दिसतं आहे??? नक्की काय? काय म्हणजे, उगाच का?

उदा. ३. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा (वय वर्ष ८) अपघात झाला होता तेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो होतो, त्यावेळेसची गोष्ट, तिथे त्याला भेटायला अजून एक बाई आल्या होत्या. भेटायला आल्यावर त्याची चौकशी सोडून त्या किस्से सांगू लागल्या. त्यानी सुरुवात केली - माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मधल्या मित्राच्या भावाच्या पुतण्याचा असाच अपघात झाला, आणि येवढं बोलून त्या शांत बसल्या नाहीत, तर पुढे म्हणाल्या, त्याचा हात वाकडा तर वाकडाच राहिला अजून.... काय हे. काय म्हणजे, उगाच का?

असो अशा गमती - जमती मुळेच तर आपण हसायला शिकतो आणि नीटं वागायला / बोलायला शिकतो.