बिनाअंड्याचा केक

  • १ वाटी मैदा+ १ चिमूट मीठ
  • १ वाटी पिठीसाखर
  • पाऊण वाटी दही
  • १ चहाचा चमचा बेकिंग पावडर
  • १ चहाचा चमचा कॉर्नफ्लोअर
  • ५ च. चमचे तेल+ ५ च.चमचे पाणी
  • २-३ च. चमचे कोको पावडर किवा आवडीचा कोणताही इसेन्स १ च. चमचा
१ तास
१०-१२ तुकडे

तेल + पाणी एकत्र करणे व भरपूर फेटणे.
त्यात इसेन्स घालून फेटणे. (कोको घालणार असाल तर इसेन्स घालायची गरज नाही. )
दही घालून फेटणे. साखर घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर एकत्र करणे. कोको पावडर घालणार असाल तर तीही त्यात मिसळणे.
चॉकलेट फ्लेवर नको असेल तर कोको पावडर घालू नका, त्या ऐवजी आपण इसेन्स घातलेला आहेच.
हे म्हणजेच मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर +कोको पावडर (ऑप्शनल) वरील मिश्रणात घालून फेटणे.
सर्व वेळी फेटताना भरपूर फेटणे आवश्यक आहे हे आता वाचून वाचून तुम्हाला माहिती झाले आहेच.
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये साधारण ३० मिनिटे बेक करणे.

नेहमीप्रमाणेच -
केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
केक झाला तरी लगेच अवन बाहेर न काढता अवनचे दार उघडून तसाच पाच मिनिटे राहू देणे.
नंतर जाळीवर काढणे, पूर्ण थंड झाला की स्लाइस करणे.

केक करण्याची आवड