कोथिंबीरीची चटणी.

  • कोथिंबीर जुडी- १
  • जीरे
  • मिरच्या -४
  • फोडणीचे साहीत्य
  • मीठ
  • साखर
  • लींबू
५ मिनिटे
२-३ वाट्या.

आता हिवाळ्यात कोथिंबीर मस्त आणि स्वस्त असते आणि माझ्या सारख्या नवशिक्या गृहिणी साठी हि खूप सोप्पी चटणी आहे.

कोथिंबीर, जीरे, मिरच्या मिक्सर मधून काढा. नंतर त्यावर लींबू पिळा. मीठ आणि साखर घाला. मग हिंग आणि हळदीची खमंग फोडणी घाला.

चटणी तयार आहे.   रेसिपी एका ओळीत संपली.  

अशीच गाजराची चटणी पण करता येते.