वेड

तु बहर ठेऊनी गेलीस
दिक्काल धुकाच्या वेळी..
अन उन साचले तेव्हा
ओघळल्या याही ओळी...!!!

कितिक सजल्या हाका
वेशीवर राघव गहिरा....
सुटल्या धुळीचा ओला
तुटतो मैथीली गजरा?

उघडेच ठेउनी दार
हे इथवर आले अंगण...
तु सारवलेली ओंजळ..
तिच्यात फ़ुलांचे पैंजण...!!

तंद्रित आरसा अजुनी
असेल पाहत तुजला
मळवट भरल्या केसांनी
असेल जरासा भिजला....!!!

भिजल्या पदराचा वारा
हा अजुन फ़िरतो आहे
तु ’वेड’च होतीस माझे
म्हणुनच घडते का हे ?

मग घेवुन केशरी साज
तु ये्शील संध्याकाळी...
सावळ्या मिठीतच पुन्हा
गोठतील नव्याने ओळी...!!!!

----एस. के .[ तु म्हणजे वेड..फ़क्त फ़क्त......वेड]