ती इवली खिडकी....!!!!!

 धाब्यावरून उतरून आत आबीजवळ गेले. तर अज्ज्याबाबा माझ्याचकरता भाकर करायला बसलेला. गरम-गरम जेऊन घे, म्हणायचीच काय ती देर होती. मी टाणटाण उड्या मारत काशाची थाळी घेऊन चुलीजवळ जाऊन बसली. नक्षी-नक्षीचा पितळी मोठ्ठा पेला भरून बिंदगीतलं गारेगार पाणी आजीनं दिलं. असं साऱ्या जामानिम्यानिशी मी आलकून-पालकून बसलेली. जणू काही जेवणाची ही सर्वात मोठ्ठीच साधना....!!!!! तव्यावरून चुलीतल्या मंद निखाऱ्यावरची टम्म भाकर माझ्या थाळीत एकदाची येऊनच पडली. त्याचा इवला आकार मी पाहत होते. तर अज्ज्याबाबा म्हणाला-, 'अरे, बिट्टू....!!!!! तुझ्याकरताच मी ही चांदकी केलीय, ती तू खा....!!!!! पोट भरलं की सांग. मी मग करायचं थांबतो. '- अज्ज्याबाबाबा असं माझं सारं कौतुकानं सारं करत होता. पण तरीही त्याला कष्ट पडतात. म्हणून आबीच्या एका तिख्खट्ट हिटलरी कटाक्षाची झलक मला मिळालीच-मिळाली. माझ्या पाठीशी भक्कम अज्ज्याबाबाचा हात होता. म्हणून आबीकडं मी काणाडोळा केला. माझी'आबी'अशीच असणार हे मी मान्य करूनच टाकलं होतं. एकदा का तिला मान्य केलं. म्हणजे माझं पूढलं जगणं, अगदीच सोप्पीच-सोप्पी व्हायचं. तरी इथल्या वाड्यात आबीनं मला बऱ्यापैकी तिच्या हिटलरीतनं मुक्त केलं होतं. त्या आनंदाचा मी अगदी मनसोक्त सदुपयोग करत होती. आनंदानं मग, काय करू नि काय नको, असं झालं, होतं. अशा हरकती करत-करत एकदाचा पोटोबा भरला, बुआ...!!! म्हणत-म्हणत, त्या गरम नि नरम चांदक्या नि गूळ-तुपाची चव इथं जरा जास्तच जिभेवर रेंगाळली. बिनापॉलिशचा लालसर-गुळमट जाडसर गरमागरम वाफेचा भात नि सप्पक वरण घासभर जास्तच खाऊन उठले, एकदाची...!!! नि डाळिंबाखाली हात धुतला. पण माझ्या काही नकोश्या हरकतीने, झाडावरल्या पाखरांनी बरीच उडाउडा केली. त्यांच्या दुनियेची मौज पाहत उभी राहिले.                                                                                            

 पण छानश्या गरमा-गरम जेवणामुळं माझ्या पापण्या जड झाल्या. नि डोळे चांगलेच मिटमिटत होते. आबी तर माझ्याकडं ध्यान देण्यापल्याड गेलेली. नि अज्ज्याबाबा लेकरू खेळतंय तर खेळू दे. म्हणून आपली लेक आबीच्या गप्पाच्या दुनियेत रमलेले. नि आबी पण अज्ज्याबाबाच्या मायेच्या दुनियेत कधीच हरवून गेली होती. म्हणून मी पण माझ्या झक्कास बादशाही दुनियेचा आस्वाद घेत होते. इथल्या वाड्यातल्या दुकानाचा वापर बंद झाला होता. आबीच्या बालपणी इथं किराणा मालाचं दुकान होतं. पण दुकानाचं अस्तीत्व जाणवणाऱ्या बऱ्याच वस्तू अजून तिथंच होत्या. त्या आबीच्या आग्रहाखातर अजूनही तिथंच होत्यां. नि इथंच ती आबीच्या बालपणची ऐतिहासिक आवडती इवली खिडकी ती इथंच माझ्यासमोर होती. वाड्यातला आपला बराच अवधी तेंव्हा आबी खिडकीत तोंड खुपसून बाहेरचा नजारा पाहण्यात मग्न असायची. नि आता मी या ऐतिहासिक खिडकीजवळ उभी होते. खिडकीजवळ अजूनही तीच आबीच्या बालपणीची चार फुटी रश्शीची बाज होती. खास स्वतःच्या हातानं अज्ज्याबाबानं आपल्या लाडक्या लेकीकरता, आबीकरता ही बाज बनवली होती. आबीच्या बालपणीची आठवण म्हणून अज्ज्याबाबाने ती अजूनही जपून ठेवली होती. मी आजोळी यायच्या आधी, ती बाज अज्ज्याबाबा डागडुजी करून घ्यायचा. मी आधीच्या वर्षी पाडून गेलेली झोळी मग गायपच झालेली असायची. वर्षभर मग त्या बाजेवर बसायची, हिंम्मत पण कुणीच करायचं नाही. त्यावर माझीच जाहागीरी होती. माझा इथं मुक्काम असेपर्यंत माझा चांगलाच घुरदाळा यावर रंगलेला असायचा. नि त्या बाजेची खरोखरच झोळी व्हयची. मी असेतोवर ती पडलेली झोळी काही मी डागडुजी बिलकूल करू द्यायची नाही. मला अशीच झोळीची बाज खूपच आवडायची. म्हणून अज्ज्याबाबा पण तशीच ठेवायचा.                                                                                                                                                                                 

 तर असा खासा जामानिमा असलेल्या झोळीच्या बाजेत टाणकन उडी मारली. नि त्यावर अंथरलेली गोधडी-सावरीची चिन्नू उशी अंगावर उसळली. नि मी ध-म-क-न नशीब झोळीतच पडले. परत जरा धडपडतच उठून सारं ठाकठीक करून. खिडकीतनं बाहेर पाहिलं. सारीच हिरवाई  सुस्त होती. झाडाखालचे प्रवाशी पण गाडीची वाट पाहत-पाहत सुस्तले होते. पाखरं उगीच आपलं अस्तीत्व आहे, आपलं म्हणून ऐकवण्यासाठीच गळा काढत बसली होती. सारा कसा सुस्ती-सुस्तीचा नजारा पाहून मला अजूनच सुस्ती आली. नि पापण्या जड-जड होत. मिटमिटत मी कधी गाढ झोपेच्या दुनियेत गेले, याचा अत्तापत्ता पण लागला नाही.                                                                         

 बराच वेळ झाला मी आपली गाढ झोपलेलीच. जाग आली नि पाहते काय तर, दुपारचा उनाचा कडाका कमी झालेला. उतरतं मंद-मंद मावळतीचं ऊन पाहायला छान जाणवत होतं. गरम-गार हवेच्या झुळका कमी होऊन. सौम्य-गार हवेच्या झुळका येत होत्या. पाखरांची घरी जायची ओढाळ उडाउडी सुरू होती. नि त्यांच्या आवाजाची लय पण लगबगीची झालेली. एकूण काय तर, पाखरांच्या दुनियेत....!!!! चक्क.....!!!!! सावळागोंधळ सुरू होता. शिवाय लहान पोरं-पोरी कडुनिंबाखाली खिडकीजवळ सावलीत खेळण्यात रमलेली. त्यांचा लहान जीव पाहून त्यांना तिथनं हाकलून द्यायची इच्छा काही झाली नाही. गाढ झोप झाल्यानं, आता जाग आल्यावर माझं मन अल्हाद झालं होतं. त्यामुळे माझा मनोबा माझ्यावर भारीच खुशच-खुश होता. नि म्हणूनच मावळतीच्या कोणत्याही आवाजाचा त्रास जाणवत नव्हता. अश्या मावळतीच्या दुनियेची खबर घेत-घेत त्या इवल्या खिडकीपाशी मी तशीच पडून होती. तसंच झोपून मी झकासपैकी आडेमोडे घेऊन आळस आलेला एकदाचा झटकुनच टाकला, कसा तो.....!!!! लंबाच-लंबा असा हुश्शšššššš........ करत-करत. माझा हात खिडकीजळ गेला. हाताला गार झुळूक अल्ल्दसा स्पर्श करत होती. नि ही झुळूक सुखद जाणवत होती. म्हणून हात तसाच ठेवला.                                                                                                     

 माझ्या हाताला मानवी स्पर्श झाला, म्हणून लोळत पडलेली. मी टा-ण- क-न.....!!!!!! बाजेतच उडी मारून झोळीतच बसले. नि बाहेर आजूबाजू पाहिलं. दोन-तीन डोकी खिडकीखाली लपली होती. माझ्या चेहऱ्यावर काय हाव-भाव झाले. याची उत्सुकता म्हणून त्या डोक्यांचे चेहरे बरोबर खिडकीत आली. माझी नि त्या चेहऱ्यांची नजरानजर झाली. त्या चेहऱ्यांना आपण कसं लवकर पकडलो म्हणून, -काहीच न सुचून तसंच थिजून उभी राहिली. मी रागवेल का म्हणून माझ्याचकडे टु-ळू-टु-ळू..... ššššपाहत होती. तर त्याचे हावभाव पाहून मलाच हसू आवरलं नाही. मी असं छानसं खळखळून हसत त्यांचं केलं. त्यानी पण आपल्या कपाळावर हात मारून घेतला. की, -असं का आपण वागलो म्हणून,,,,,!!!!!! नि ते पण तोंडभर गोडसं हसून मोकळे झाले. ते सारे म्हणजे, हरणा-चंदना-सुग्रीव-वाली....!!!! होते. वाड्यातल्या अज्ज्याबाबाची लाडोबा नात म्हणून मला तसं ते दबकूनच वागत होते. पण माझं तसं वागणं-बोलणं-जरा अतिच मोकळं-ढाकळं म्हणून इतकं तरी मला त्यांनी दाद दिली.                                                                                                                                                                                                           

 त्यांना मी म्हणाले की, -इथं वाड्यातल्या पेठदारातनं आत का येत नाही. -तर पहिलं मी-पहिलं मी म्हणत बाकीच्यांना ढकलून खिडकीच्या गजात तोंड खुपसून फक्त नाक दाखवत-दाखवत वाली म्हणाला, -डाळिंबाखाली अज्ज्याबाबा निजलाय. पेठदार का वाजवलं म्हणून आमच्यावर आधीच खवळून गेलाय. तुझ्यासोबत आम्हाला खेळायचं आहे. इथं खिडकीजवळ उभं राहून तुला हाका मारतोय. पण तुझी काही'ओ'येईना. मग तुझा हात कसा बाहेर कसा काय आला. म्हणून त्याला हलवला. तर तू दचकून जागी झाली. एका दमात तो बोलून गेला. इतकं बोलत होता. पण मला त्याच्या गजातांतनं तोंड काढून बोलणाऱ्या तोंडाकडं ध्यान नव्हतंच. तर मला त्याच्या डोकवणाऱ्या नकट्या नाकाचीच खूप फिकर लागली होती. मी त्याला म्हणाले, -'ते आधी तुझं नाक सावर. तोंड बाहेर घे. '-नि लगेच जीभ चावत. त्यानं तोंड बाहेर केलं. मगच मला बोलायला सुचलं. पण, आता मला बोलायचंय म्हणत-म्हणत हरणा-चंदना वालीला बाजूला ढकलून खिडकीत आल्या. दोघी खिडकीजवळ ऐसपैस हात पसरून. एक हात गालावर घेऊन उभारल्या. हरणा म्हणाली, -'आमच्या अजून दोन-तीन दोस्तीनी बी खेळायचं म्हणताय तुझ्याशी-'.....!!!!! मी आपलं नंदीबैलासारखं मोकळी-ढाकळी मान डोलवली होती. लगेच चंदनानं त्या खिडकीबाजूच्या भिंतीलगत उभ्या असलेल्या दोघींना पुढं खिडकीजवल ओढलं. हरणा-चंदनापेक्षा त्या खूपच संकोची होत्या. पण माझं आपलं मोकळं-ढाकळं हसू पाहून दोघी बऱ्याच सावरल्या. नि खूलल्या.....!!!!!! चांदणी म्हणाली, -'या दोघी बहिणी'शारकी-भूरकी'....!!!! आमच्याच वर्गात आहेत. शेजारीच राहतात. यांना भाऊ नाही. मला चंदना सांगत होती. पण मला त्या सामान्य माहितीत काही पण रस नव्हता. माझी नजर तर शारकीच्या निळसर डोळ्यात बुडून गेले होते. खूपच बोलके डोळे नि गोडऱ्हसरा चेहरा पाहून मला खूप प्रसन्न जाणवलं. तिची बहिण भूरकी-नावाप्रमाणेच भूरक्या रंगाची. घाऱ्या बोलक्या डोळ्यांची शारकीसारखंच गोडऱ्हसऱ्या चेहऱ्याचीच...!!!! दोघी पण मला खूप आवडल्या. परीराज्यातनं चुकून इकडं कुठं देवानं त्यांना नक्कीच माझ्यासाठीच पाठवलं असणार......!!!!!!                                                                                                                                        

 हरणा-चंदना-शारकी-भूरकी नि सुग्रीव-वाली यांना खिडकीजवळ दाटीनं पण उभं राहता येत नव्हतं. त्यांची ढकलाढकली रंगली होती. पण यात कुणा एकाची बाजू घ्यायचा प्रश्नच येत नव्हता. कारण मला हे सहा सोबती अवघ्या काही क्षणातच भारीच आवडले होते. दुकानातनं त्यांना यायला म्हणून पेठदार उघडायला मी बाहेर आली. पण पाहिलं तर काय.....!!!!! पेठदाराची लोखंडी कडीकुंडी लांब दोन फूटी नि चांगलीच जड होती. उंचावर असल्यानं माझा हात तिथवर पोचत नव्हता. आतमध्ये डोकवून पाहीलं तर आबी-आजी ओवरीत गाढ निजल्या होत्या. बाहेर डाळींबाखाली निवांत निजलेला अज्ज्याबाबा पाहून. त्याला जागं करायची मला बिलकूल इच्छा झाली नाही. पेठदाराच्या कडीकुंडीची ऐकमेकात बरीच गुंतागुंत होती. कशातनं काय काढावं, नि काय घालावं. हे मला उमजलंच नाही. माझं मन बरंच परेशान झालेलं. नि मी खट्टू मनानं खिडकीजवळ आली. माझी अडचण त्यांनी समजून घेतली. तसं खिडकीच्या आत नि बाहेर बरीच अर्धा फूटी जागा होती. त्यामुळं खिडकीत हात ठेऊन आरामात गप्पा करता येत होत्या. मी आत बाजेत गोधडीवर-गोधडी रचून. सर्वात वर सावरी उशी घेऊन बसले. आता माझी ही बैठक आरामाची नि बादशाही झाली होती. त्यामुळं माझा जीव सुखावला. पण बाहेर खिडकीपाशी ती सहाजणं चुळबुळत होती. म्हणून माझा जीव परेशान झाला. पण आमच्यात मजेशीर वाक्याची देवघेव सुरू होती. नि त्याचं खदखदून हसू येत होतं. जरा वेळाने मी हरणाल म्हणाले, -की, मला काहीतरी खेळ शिकवा ना..!!! तसंही इथं अर्धा फूटी जागा आहे की-त्यात काय जमेल ते शिकवा. अज्ज्याबाबा उठला की मी त्याला पेठदार उघडायला लावते काय, ठिक ना.....!!!!! (क्रमश:)