शब्दांचे खेळ....

किती सोपं असत नाई
शब्दांचे असे हे खेळ करणं,
भावनांच्या गुंत्यात गुंतवून
ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं ।

पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द
काहिना-काही अर्थ घेऊन पडतात,
थोडीशी जागा चुकली तर मात्र
हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात ।

पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील
काहिना-काही सांगत असतात,
चुकीचीच का असेनात.. पण आपापली मते
ते ठामपणे मांडत असतात ।

वाक्यातील हे शब्दच कधी-कधी
वाक्यातील मर्म बनून जातात,
हसवताऱ्हसवता नकळतच
डोळ्यातून ते पाणी काढून जातात ।

असेच असतात हे शब्द
जे वाक्यांना आधार देऊन जातात,
कसेही फिरविले तरी.. प्रत्येका समोर
ते काहिना-काही मांडून जातात ।

वाक्यांतील शब्दांचे हे खेळ
प्रत्येका कडून खेळले जात असतात,
निर्रथक वाक्यांतून अर्थपूर्ण शब्दांचे शोध
नेहमीच घेतले जात असतात ।

हर्षद अ. प्रभुदेसाई............