लसूणी पालक पनीर

  • पालक २ गडड्या पाने स्वच्छ धुवुन
  • आल १ इंच + लसुण पेस्ट २ चमचे + हिरव्या मिरच्या ५ ते ६ यांचा ठेचा
  • लसुण पाकळ्या बारिक चिरुन २ चमचे
  • २ टोमेटोच्या मोठ्या फोडि चॊकोनि चिरुन
  • फोडणी साठि : शहाजिरे १ चमचा + ३ लवंगा + २ दालचिनी + वेलची ३
  • फ़्रेश क्रिम १ वाटि
  • १ वाटि दुध
  • पनीर क्युबस
  • साखर १/२ चमचा
  • मीठ चविनुसार
  • तेल किंवा तुप आवश्यकते नुसार
  • थोडे बर्फाचे पाणी
२० मिनिटे

१) पालक ब्लान्च करून घ्या.------------------>
पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ घालून धुतलेली पालकाची पाने ४ ते ५ मिनिटे उकळवा.
पाने रोळीत (गाळणीत) घालून लगेचच वरून थंडगार बर्फाचे पाणी ओता.. असे केल्याने पालकाचा हिरवा रंग तसाच राहण्यास मदत होते. आता हा पालक सुरीने चिरून घ्या... मिक्सर वर दूध व किंचित साखर घालून वाटून (प्युरी करून) घ्या. न चिरता तसाच वाटला तर रेषा रेषा तशाच राहतात. दुधामुळे पालकाचा अडुक पणा कमी होतो. रंग हि सुरेख येतो प्युरी ला.

२) आता वेळ झाली फोडणीची.... भांड्यात तेल गरम करून त्यात शहाजिरे, लवंग, दालचिनी, वेलची खमंग फोडणी करा.

३) आता यात आलं लसूण मिरचीचा ठेचा घाला.. छान परता.

४) टोमेटो घालून जरासं परता. निम्मा फोडणीत व उरलेला टोमेटो शेवटी घातला तरी चालेल.

५) पालकाची तयार प्युरी घाला. एक उकळी काढा.

६) पनीर घाला... चवीप्रमाणे मीठ घालून परत १ उकळी  येऊ द्या.

७) क्रीम घाला. आता जास्त वेळ जाळावर ठेवू नका.

८) जाळावरून खाली उतरवून त्यात. एका कडल्यात तूप किंवा तेल घेऊन तापवून त्यात बारीक चिरलेला लसूण घालून जरा लाल होइस तो पर्यंत तळा.... हा कुरकुरीत लसणाची फोडणी तयार पालक पनीर वर ओता.

९) खमंग पालक लसूणी तयार आहे.....मस्त चपाति किंवा भाताबरोबर खा.

  • पनीर न घालता केले तर याला पालक लसुणी म्हणता येइल.
  • आखा गरम मसाला आवडत नसेल.. तर त्या ऐवजी शेवटी चिमुट गरम मसाला घालू शकता.
  • जर फार घट्ट ग्रेव्ही नको असेल तर आवश्यकते प्रमाणे पाणी हि घालू शकता. मी थोडे पाणी घातले आहे.
  • फोटो ची क्वालिटी खराब आहे. त्याबद्दल दिलगिर आहे. 

मनू स्टाइल.....