एक कवी कविता करतो
मस्तपैकी झुलत असतो
छान छान स्वप्नामध्ये
कसा अगदी हरवून जातो
कसल्या कविता
कसले शब्द
जरा जुळवा
जुळवण्यात काय आहे
शब्द म्हणजे गंमत आहे
जरा कोणी छान म्हणा
मग शब्द छान फुलतात
हलके हलके गाणे गातात
मनात तुमच्यां ताल धरतात
कसले वृत्त कसल्या मात्रा
तुम्ही आपले लिहित रहा
सुरवातीला ठीक आहे
वृत्त मात्रा आकार उकार
नंतर तुमचे तुम्ही व्हा
तुमचे शब्द जादू करतील
तुमच्यावर फिदां होतील
एक मात्र जरूर करा
आपणच आपले मस्त रहा
मस्त पैकी फुलत रहा
मग ....?
शब्द तुमच्यावर फिदा होतील
खरेच तुमचे सूर होतील
सुरांचे गाणे होईल
तो दिवस दूर नाही
निळे आभाळ मुठीत राहील
एक मात्र जरूर करा
फुलासारखे फुलत रहा
एवढाच मंत्र ध्यानात ठेवा
मग गाणे तुमचे आहे ...!!