गेले ते दिन गेले...

तेव्हा...
शब्द राम जागवित होता
सत्यास सावली नव्हती
ज्ञानाचा तोरा नव्हता
दानाला विकल्प नव्हता
गेले ते दिन गेले...

नंतर...
शब्द शब्द उष्टा होता
सत्यास भल्याचा आडोसा होता
ज्ञानाला विवेकाचा लगाम होता
दानाला अपात्राचा अटकाव होता
गेले तेही दिन गेले...

आता...
शब्द सारा   बेगडी आहे
सत्यास बेडी घातलेली
ज्ञान बाजारू झालेले
दानास प्रदर्शन हवेसे...

सूर्याचे ग्रहण सुटण्याची  प्रतीक्षा!!