"चिऊताई कुठे दिसेना"
अग अग चिऊताई,
कोठे दिसेना गं बाई।
कुठे कुठे शोधू तुला,
मज कळतच नाही ॥ध्रु॥
कधी डोंगर कपारी,
कधी घराचे कोपरी।
काटया कुटया जमवून,
घर बांधी उंचावरी॥
किलबिलाटाने तुझ्या,
रोज आम्हा जाग येई॥१॥ध्रु॥
सिमेंटच्या जंगलात,
तुला दिसेना गं जागा।
बांधशी कोठे घरटे,
ना वळचणी ना लगा॥
घर बांधण्यासाठी तू,
दूर दुर बघ जाई॥२॥ध्रु॥
येई लवकरी आता,
देतो तुला मी घरटे।
दिसू दे गं चिमुकले,
तुझे बाळ ते गोमटे॥
तुझ्याविना सुने आता,
वाटे आम्हा ठायी ठायी॥३॥ध्रु॥
अनंत खोंडे.
२४।३।२०११.