महान एकदा तरी

दिसेन मी हिमालया समान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हवेत उच्च्भ्रू सदा तरंगती असे कसे !
धरेस पाय टेकूदे निदान एकदा तरी

अमीर जाहलो उगा व्यथा व्यथाच राहिल्या
हसावया बनेन मी लहान एकदा तरी

सुखात मी धनाविना, धनात ते सुखाविना
कळो तया विसंगती किमान एकदा तरी

विचित्र फैसले दिले सवाल मौलवीस हा
खरेच वाचलेस का कुरान एकदा तेरी

ठराव मीच मांडला शराब बंद या क्षणी
लपून शांतवेन मी तहान एकदा तरी

दिसावया हरीभरी नटून ही वसुंधरा
हवेत वृक्ष व्हावया विरान एकदा तरी

गळ्यात आज घातली तुझीच माळ म्या प्रभो
मनात धाड भक्तिचे उफान एकदा तरी

करून शायरी "निशा" खुशीत तूच राहसी

वजूद(*) दावता मिळेल मान एकदा तरी

(*) अस्तित्व existence

निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail:- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा