नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

( चाल :  इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी  )

नव्या साडीसाठी  - दोघांची भ्रमंती
चालली  खरेदी.. थांबेना ती  |धृ |

सवलतींचा ताजा - लागतो ढीग
नाचती विक्रेते.. मागे पुढे  |१|  नव्या साडीसाठी -

माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब
भांडणात वाढ.. पत्नीसंगे  |२| नव्या साडीसाठी -

मागची उधारी - राहिली अजून
जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही  |३| नव्या साडीसाठी -