मैफील आज जमली -

मैफील आज जमली , पण रंग नाहि भरला
 

नादात मी तिच्या-तो कोठेतरी विसरला !

 

मी देवळात दमलो देवीस शोधताना
 

माता घरात दिसली दारात जीव हसला !

 

शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो -
 शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला !

  

पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा ;
 गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला !

  

पाठीत वार केला तो मित्र मीच जपला
 वैरी समोरुनी का जाता उगाच हसला ?