एकटा

आताशा  मी  कोणाशीच  attach   होत  नाही..
कोणाशीच वेवलेंथ माझी  match होत  नाही .. 

कोणी  हसून  बोललं  तर  मीही  तोंडभर  हसतो ..
बोलायलाच पाहिजेत  म्हणून  2 वाक्य  बोलतो ..

इनोसंट प्रेमाची  आता भीतीच  वाटते  जरा

मैत्री  बित्री  प्रकार  फक्त  फेसबूक वरच  बरा

विचारलाच  कुणी  तर  म्हणायचं  "I'm fine "
नकोच  वाटल  बोलायला  तर  जायचं  offline.

मन  आता  घेत  नाही  कोणाकडे  धाव ..
राहत  फक्त  कुरवाळत   चिघळलेले  घाव .

संपलेत  मित्र  राहिलीयत  फक्त  प्रोफेशनल नाती

सांभाळायची  फक्त  वीकेंड मजेत  घालवण्यासाठी ..

मन  झालाय  प्लास्टिक  आता  होत  नाही  ओलं  
कळलंच  नाही  कधी  आपल्याच  कोशामध्ये  गेल ?

मित्रांचेही  फोन  आता  सोयीनुसार  घेतो ..
पत्ता  विचारलाच  कोणी तर ...... फेसबूक id देतो !