पैठणी

एखादा अनुभव असा येतो भरजरी पैठणीसारखा असतो

आयुष्यात केव्हातरी एकदाच घेता येतो ....१

अनुभवाची घडी घालून मनाच्या पेटीत ठेवून द्यावी

प्रसंगोपात्त केव्हातरी अंगभर नेसून घ्यावी....२

एरवी तिची कधी गरजही भासत नाही

ऊठसूठ पेटीसुद्धा ऊघडाविशी वाटत नाही....३

फरक मात्र इतकाच आहे म्हटला तर मोठा आहे

चारचौघातसुद्धा पैठणी मिरविता येते

अनुभवाची घडी मात्र एकांतातच मोडता येते....४