कट्ट्यावरती बसला होता म्हातारा एक
तृप्त विरक्त तरी उदासवाणे भाव नजरेत १
दिसत होती अनुभवाची खाण पाठीशी
थबकले परी शब्द होते त्याच्या ओठाशी २
नव्हते देणे आणि घेणे आजुबाजूला
येणाजाणाऱ्यांच्याही नव्हता खिजगणतीला ३
नव्हते कोठे जायाचे अन यायचेही नव्हते
घरीही कोणी दारापाशी वाट पाहत नव्हते ४
उसंत होती वेळही होता न्व्हता कामाचा ताण
घालवायचाच होता येणारा हर क्षण ५
विचार आला तेव्हा , मनाशीच माझ्या
असतील त्याने केल्या , किती गोष्टी कामाच्या ६
नसेल उसंत झोपही नसेल
पैसा पण असेल परी
मिळतेजुळते घेऊनसुद्धा
नसेल वेळ हाता ! ७
असेल सत्ता पदही असेल
असेल विचारत प्रत्येक
आज मात्र उरला होता
एकटाची एक ८
कट्ट्यावरती बसला होता म्हतारा एक
तृप्त विरक्त परी उदासवाणे भाव नजरेत !!