हरवलेला किनारा

का कधी दिसला न मजला शुक्रतारा?
शोधण्या माझा हरवलेला किनारा

अंतरीचे दु:ख मी सांगू कुणाला?
एकही नाही मनीचे जाणणारा

नवग्रहाची मी पुजा करतोच आहे
देव जाणे काय नियतीचा इशारा

संपदा माझी जरी गडगंज आहे
आज ती भासे मला फापट पसारा

का असे बेबंद झाले गुंड सारे?
कोण त्यांना पाळणारा, पोसणारा?

अर्थशास्त्री भांडवलवादी कसे हे?
राहतो प्यासा भुकेला राबणारा

कायदा उलटाच येथे, तोल जाता
होतसे बदनाम प्याले झोकणारा

वार उलटे लाचखोरांचे असे की
सत्त्यवादी जाहला "आण्णा" बिचारा

का उगा "निशिकांत" मृत्त्यू स्त्रीभ्रुणाला?
देव जाणे काय त्यावरती उतारा

निशिकांत देशपांडे. मो. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १