'सुंदर मुली'
सुंदर मुली भाव खातात...
सहज दर्शन द्यायला महाग का होतात?
'सुंदर आहेस' म्हटलं की तेव्हा नाक मुरडतात...
पण पुन्हा पुन्हा जाउन आरशात का पहातात?
सुंदर मुली बोलायला जड होतात...
पण झलक द्यायला आतुर का असतात?
सुंदर मुली शेफारून जातात...
'कौतुक' करणाऱ्यालाच कमी का
लेखतात?
'मला आवडलं नाही' हमखास सांगतात...
पण 'पुन्हा बोलायची' वाट का पहातात?
-सुहास विनायक मळेकर