'विदासा''[ जगती असा कवण जन्मला...]

'विदासा''[ जगती असा कवण जन्मला...]
 
 सावरकर म्हणजे निधड्या छातीचा क्रांतिकारक, निश्चयाचा उत्तुंग
हिमालय,
देशप्रेमाच्या विचारांची प्रवाही पवित्र गंगा, देशभक्त अन क्रांतिवीरासाठी स्फूर्तिदायी अंगार!
एक माणूस नेमकं काय काय करू शकतो? सावरकर
म्हणजे खरंतर मानवीशक्तीच्या पलीकडले व्यक्तिमत्त्व !
प्रचंड स्मरणशक्ती, तल्लख बुद्धिमत्ता लाभलेला आणि त्याच्या जोरावर 
पुढचा अचूक अंदाज वर्तवून योजना बनविणारा , मातृभूमीभक्त द्रष्टा नेता 
आपल्याला लाभला होता. ज्यांनी मांडलेले विचार
आज पन्नास-साठ वर्षांनंतरही प्रत्ययास येतात. 
त्यांनीच म्हटल्याप्रमाणे 'सावरकर ३० वर्षे सर्वांच्या पुढे असतो' हे मान्य करावयासच  हवं.  
कारण आजचं पोखरलेले
राजकारण, ढासळलेले समाजकारण 
त्यांच्या दुर्लक्षिल्या गेलेल्या विचारांचे निर्विवाद पडसाद आहेत...
 
सावरकर क्रांतिकारक तर होतेच,
निर्भीड पत्रकार, प्रेरणादायी कवी, उत्कृष्ट नाटककार,
उत्स्फूर्त पण जागरूक वक्ता आणि निःस्वार्थी राजकारणी देखील होते.
देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी घरावर तुळशीपत्र
ठेवलं आणि
संपूर्ण ताकदीनिशी ब्रिटिशांना नामोहरम केलं. 
याचा परिणाम म्हणून, पन्नासवर्षांच्या सजा सुनावणीनंतर 
द्रष्ट्या सावरकरांनी ब्रिटिशांना उलट सुनावलं,"पन्नास वर्षे? तोवर तुमचं [ब्रिटिश] राज्य टिकलं तर!"
आणि त्यानंतर पन्नास वर्षे न टिकता खरोखरच ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली ...
हा द्रष्टेपणा नव्हे काय?
 
सावरकर म्हणजे या भरतभुमीचा खरा सुपुत्रच!
या भूमीला अनेक क्रांतिवीर सुपुत्र लाभले, 
तद्वतच केवळ त्याग आणि त्यागाचे
मूर्तिमंत उदाहरण समजल्या जाणा-या
भरतभूमीच्या या थोर सुपुत्राचा
पदस्पर्शही
झाला.
 
'स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सावरकरांना अभिप्रेत मातृभूमीचा विकास'
हा संपूर्णपणे वेगळा विषय ठरत असला तरी,
स्वातंत्र्यवीरांचे ज्वलंत नि शुद्ध देशभक्तीचे विचार  नवतरुणांपर्यंत पोहोचावेत 
यासाठी ज्यांना सावरकर
'थोडेबहुत' कळले त्यांनी प्रयत्न करण्यास हरकत नाही,
म्हणून...
 
सावरकरांच्या
मार्सेलिस बंदरातल्या उडीला  ८ जुलै २०१० ला 100 वर्षे पूर्ण झाली.
या ऐतिहासिक घटनेला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व प्राप्त झाले होते.
या घटनेच्या शतकमहोत्सवाचं औचित्य साधून सावरकरांना आदरांजली तसेच
 
क्रांतिकार्यात सक्रिय
राहूनही मराठी
भाषेवर विलक्षण प्रेम करून 
मऱ्हाठीजनांसाठी,
मराठी भाषा तसेच मराठी साहित्य समृद्ध केलेल्या 
या भाषाईश्वराला आगळीवेगळी मानवंदना देऊया...
 
'त्याग' तसेच
'मूर्तिमंत त्याग' या अर्थासाठी मराठी भाषा-शब्दकारांनी, भाषातज्ज्ञांनी
तसेच महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन 'विदासा' हा 'संमिश्रलिंगी' शब्द
शब्दकोशात
सामावून घ्यावा. ज्याचा वापर 'त्याग'
या पुल्लिंगी शब्दाला स्त्रीलिंगी व नपुसकलिंगी पर्याय म्हणूनही करता येईल, 
अशी मी संबंधितांस नम्र प्रार्थना करतो.
समस्त सावरकर प्रेमींनी याचा पाठपुरावा करून कार्य सिद्धीस न्यावे.
   
'विदासा' हा शब्द खाली
दिलेल्या अर्थाने वापरता
येईल---
 
विदासा म्हणजे, विनायक
दामोदर सावरकर...
विदासा
म्हणजे, केवळ
त्याग...
विदासा
म्हणजे, 'तुळशीपत्र ठेवणे'चं ज्वलंत
उदाहरण...
विदासा
म्हणजे, एका विशिष्ट ध्येयासाठी केलेला सर्वस्वाचा
त्याग...
विदासा
म्हणजे, मूर्तिमंत
त्याग...
विदासा
म्हणजे, दुर्दैवाने दुर्लक्षित केला गेलेला त्याग...
विदासा
म्हणजे, त्या त्यागाचं मोल अप्रूप असूनही मूल्य
ठरविता न आलेला त्याग...
विदासा
म्हणजे, किंबहुना मोल ठरविण्याची इतरांच्याकडे कुवत
नसलेला पराकोटीचा त्याग...
 
म्हणजेच 
विनायक दामोदर सावरकर...
विदासा!
 
उदाहरणेच  द्यायची  झाली तर...
- सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी संसाराची विदासा केली.[स्त्रीलिंगी]
- समस्त क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा
विदासा
केला.[पुल्लिंगी] 
-
सर्वस्व विदासा केलं आणि  क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याचं फलित मिळवलं.[नपुसकलिंगी]
 
-सुहास
विनायक
मळेकर
[सदरहू
माझा वैचारिक-विनंती लेख 'व्यास क्रिएशन्स'च्या  'प्रतिभा' 'दिवाळी विशेषांक २०१० मध्ये प्रसिद्ध झालेला आहे...
या पत्राची मूळ प्रत
सावरकर स्मारक समितीकडे दिलेली आहे...
तसेच
आदरणीय श्री विक्रमजी सावरकर यांच्याकडेही एक प्रत सुपूर्द  केली
आहे...
दुर्दैवाने सावरकर प्रेमीं
कुणी पुढे आलेले नाहीत...
 
सदर लेख प्रसिद्ध करायचा  झाल्यास 
मूळ लेखकाच्या नावासह प्रसिद्ध
करणे...]