पाउस

कोठे गेला? लपला पाउस
येता येता विरला पाउस

वांझोट्या मेघाच्या पोटी,
आस फुकाची, कुठला पाउस !

गरिबांशी देणे ना घेणे
टाटा बिर्ला बनला पाउस

फास कसाया शेतकऱ्याच्या
मानेला, ओसरला पाउस

शुष्क कधी ओल्या दुष्काळी
क्रूरपणाने हसला पाउस

दिंडीमार्गी काय बरसला !
भक्ति रसाने भिजला पाउस

तप्त धरेला हिरवा शालू
भेट कराया पडला पाउस

मल्हाराचा सूर होवुनी
धोधोधो कोसळला पाउस

जंगल, हिरवळ घटली इतकी
"निशिकांता" गुदमरला पाउस

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १