लहान मुलांच्या गोष्टींचा प्रवास

     अपवाद वगळता लहान मुलांच्या गोष्टींची सुरुवात परीकथा, जादूच्या कथांपासून होत आली आहे. त्यानंतर थोडे कळू लागल्यावर रामायण, महाभारत, इसापनीतील गोष्टी सांगितल्या जातात. त्यानंतरच्या टप्प्यावर फास्टर फेणे, गोट्या, टारझन ही पुस्तके हातात दिली जातात. क्वचित् मुले आपणहून घेतात. अखेरच्या टप्प्यात कादंबऱ्या, कथा वाचल्या जाऊ लागतात आणि इथे प्रगल्भतेला सुरुवात होते.
     अलीकडे एक मतप्रवाह असा आला आहे की,
परीकथा- जादूच्या कथा  सांगू नयेत, थेट वास्तव अनुभवच गोष्टीरुप सांगावेत ज्यायोगे मुले काल्पनिक  जगात फारशी गुंतून पडणार नाहीत व त्यांची खऱ्या आयुष्याशी ओळख होईल. 
    दोन्ही प्रकारची मते दिसतात.
    आधीपासूनच खरे खुरे सांगितल्यावर मुलांना कल्पनेच्या राज्यात रमायला अवकाश देता येणार नाही. पहिल्यापासून वास्तव सांगून त्यांचे ओझे का वाढवायचे, असे मत मांडले जाते. आधीपासून खरे खुरे सांगितल्यावर मुले भ्रामक जगात वावरत नाहीत व त्यामुळे वास्तव जीवन स्वीकारायला चटकन तयार होतात, असेही मत मांडले जाते. 
 
   
गोष्टींचा पारंपरिक प्रवास बदलावा ?