मना, उगीचच इतके तू रडतोस कशाला?

(दिल आखिर तू क्यू रोता है (जावेद अख्तर) : भावानुवाद)

जेव्हा जेव्हा दुःखाने आभाळ दाटले


जेव्हा जेव्हा दुःखाचेही सावट आले

जेव्हा अश्रू डोळ्यांच्या अल्याड थांबले

जेव्हा दुःखी हृदयामध्ये भय पिसाटले

समजावाया मी हृदयाला हे सुनावलेः

मना, उगीचच इतके तू रडतोस कशाला?

असे नेहमी करायची तर सवय जगाला... 

भीषण सारे इथले सन्नाटे

काळ ठेवतो साऱ्यांचे वाटे

सर्वांकरता दुःखे काही

सर्वांसाठी तप्त उन्हेही...

उगा तुझे ओले का डोळे?

क्षणाक्षणाचे ऋतू निराळे!

क्षण असले तू गमावुनी बसतोस कशाला?

मना, उगीचच इतके तू रडतोस कशाला?...


मूळ कविताः दुवा क्र. १