(चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)
तळतेस भजी तू जेव्हां -
जीव 'सुटका सुटका'
म्हणतो..
मिरच्यांचे वरती
तुकडे
तोंडात घास का फिरतो ?
बघ फेटून पीठ-
कसाही
का गोळा कच्चा
जळतो !
ही जिव्हा
रुचीहीन होते -
अन्
तोंड पोळता कण्हतो !
येताच कुणी
दाराशी..
क्षणभरात सरती मागे
खिडकीशी धुरकट
वारा-
तो वांधा करून जातो
!
तव तेलीं
विरघळणाऱ्या
मज दिसती
कायम गुठळ्या -
त्रासाधिन खारट गोळे
मी
तसाच गुपचचुप खातो !
तू लांब सखे मज
धाड
नच सांगू ही भजी खाण्या -
कढईचा जीव उगाच..
माझ्यासह कुरकुर करतो !
का अजून गॅसही मोठा
!
ना तंत्रच जमले अजुनी ?
भजी का तू तळतच पिडते
-
भजी खाऊन जीवच रडतो !!