गोडवा सासू सुनेतिल ( हज़ल )

गोडवा सासू सुनेतिल खास होता
चांदणे होते खरे की भास होता

का म्हणे सासूस आई सून, कळले
साखरेतुन कारल्याचा घास होता

शांत असतो, बायको वागो कशीही
राग येण्या तो कुठे दुर्वास होता?

वाघ होता तो जरी कार्यालयीचा
बायकोचा तो घरी तर दास होता

बोलते कृत्त्यातुनी,मज छान कपडे
आणले पोळ्यास हा उपहास होता

ती जरी बाहूत होती, मैत्रिणींचा
पाहिला स्लाईड शो, फर्मास होता

गैर का "निशिकांत" आहे राग त्यांचा?
सभ्य तू असशील ठरला भास होता

निशिकांत देशपांडे  मोंनं.  ९८९०७ ९९०२३