मनी कालच्या मस्त रुजल्यात गोष्टी
उद्याच्या कशाला करव्यात गोष्टी?
तुझे दु:ख आहे तुझ्या एकट्याचे
जगाला तुझ्या का कळव्यात गोष्टी?
झिझावे जरी लागले आपणाला
तरी चंदनाच्या नसाव्यात गोष्टी
असूदेत काटे बगीच्यात लाखो
सुगंधी फुलांच्या फुलाव्यात गोष्टी
मुले पाहती रोज निंजा हटोरी **
जिजाऊ-शिवाच्या हरवल्यात गोष्टी
गटारीस चर्चा कशाला दयेची?
चिकन बोकड्याच्या असाव्यात गोष्टी
किती धुंद बेधुंद जगलोत आपण !
सुवर्णाक्षराने लिहाव्यात गोष्टी
कुणाला नको त्रास मम आठवांचा
सवे माझिया त्या सराव्यात गोष्टी
वियोगात "निशिकांत" जगसी कसा रे?
मनाशी मनाच्या दुराव्यात गोष्टी
** कार्टून शो मधील पात्रे
निशिकांत देशपांडे मो. नं. ९८९०७ ९९०२३
E Mail -- nishides1944@yahoo.com