खोबर्‍याची वडी

  • १ वाटी खोवलेले खोबरे.
  • १.५ वाटी साखर.
  • वेलदोदोडा पावडर चवीपुरती
२० मिनिटे
५ - ६ जणांना पुरेशी व्हावी.

१. खोवलेले खोबरे व साखर तासभर एकत्र करुन ठेवा.
२. यात वेलदोडा पावडर घालून मंद आचेवर शिजवत ठेवा.
३. साधारण कोरडे होईपर्यंत शिजवा.
४. एक किंवा दोन ताटांना तूप लावून हे मिश्रण त्यावर पसरवा.
५. थोडे गार झाल्यावर सुरीने वड्या पाडा.


मिश्रण शिजवताना त्यात रंग येण्यासाठी गाजर किसून घालता येईल किंवा आमरस घालून सुद्धा छान चव येते.

आई