टेक्नॉलॉजी

गेले निघोनी मित्र पडलेत ओस कट्टे
ऑर्कूट फेसबुकवर हाय बाय रोज होते

सुचतील काय गप्पा, प्रत्यक्ष भेट होता
संपून विषय गेले, परवाच चॅट करता

हिरवे कुणी नि लाल, स्टेटस कुणास पिवळे
अदृश्य ते कुणी हो, लपण्यात धन्य झाले

आले मनात काही, झाले क्षणात पोस्ट
प्रत्यक्ष बोलण्याचे घ्यावे कशास कष्ट?

डोळ्यामधील भाव, खांद्यावरील हात
नसता कशा विणाव्या गाठी मनात घट्ट?

या नेटने जगाला का आणिले समीप
हे बंध रेशमाचे लोटीत दूर खूप

(कवितेची प्रेरणाः मिलिंद केतकर यांची टेक्नॉलॉजी कविता)