जरी वाट भरली धुक्याने
तरी साथ केली उन्हाने
कशी ऐकली या दऱ्यांनी?
तशी साद होती मुक्याने
विनवण्या कशाला नभाच्या?
हमी घेतली की झऱ्याने
असेना ऋतू कोणताही
फुलांनी फुलावे नव्याने
तमाची कशाला मिजासी?
उजळली निशा काजव्याने
जरा घे भरारी मना तू
सवे शब्द येती थव्याने
---------------------------------- जयन्ता५२