अंधारयात्रा

वाह्यात विद्युल्लता ही सळसळती

सदैवच तयारी पलायनाची 
झोप ऊडे साऱ्या महाराष्ट्राची
घरघर तीला लागली अखेरची......१
आकडे तारेवर, अन मंद मीटर
नवकल्पना काळवंडू लागली
घर्षणाने, गारगोटीने आग
जुनीच तंत्रे ती पुन्हा प्रकटली.......२
मशाली, दिवट्या अन टेंभा इत्यादी
शब्दांनी, पीढीच समृद्ध झाली
गीझर, फ्रीझ, आणि ईस्त्री इत्यादी
मंडळी काम न करताच वृद्ध झाली..३
माठ, बंब, आणि पखाल इत्यादी
सामुग्री ती प्राचीन, प्रगटली
चिमणी,  कंदील, समई इत्यादी
लाजून मुरडत प्रकाशू लागली.....४
शक्ती वीजेची गोठली, खंगली
अधोगतीचाच रागोळी सजली
विद्युतमंडळाची पींडे कीडकी
कावळ्यांनीही वाळीत टाकली....५