थोडे कळाया लागले
'मी'पण गळाया लागले
प्रासाद हा,ती झोपडी
दोन्ही छळाया लागले
उदयास आला सूर्य अन्
मन मावळाया लागले
नात्यात भेगा वाढल्या
घर कोसळाया लागले
ती काय होती बातमी?
सारे पळाया लागले
डोकावले माझ्यात जे
ते हळहळाया लागले
--------------------------------------- जयन्ता५२