निवडणूक सुधारणा आणि मी

निवडणूक सुधारणा 
               संसदीय लोकशाहीत संसद सर्वतोपरी असली तरी आपण पाठवलेले प्रतिनिधी संसदेत बसण्याच्या लायकीचे असतीलच याची खात्री देता येत नाही. उलट पक्षी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेतून नालायक उमेदवार निवडून येण्याचीच शक्यता अधिक आहे आणि विद्यमान खासदारांचे संसदेतील  वर्तन बघता त्यातले बहुतांशी खासदार संसदेत बसण्यास लायक नाहीत असाच निष्कर्ष काढावा लागेल म्हणूनच निवडणूक सुधारणेचा कार्यक्रम अग्रक्रमाने हाती घेणे अत्यावश्यक आहे.
              या  प्रयत्नात सरकार किंवा विद्यमान खासदार पुढाकार घेऊन काही सुधारणा करतील याची सुतराम शक्यता नाही जे काही करायचे ते आम आदमिलाच करायला लागणार आहे आणि आम आदमी हि सदोष निवडणूक प्रक्रिया बदलू शकतो असा माझा ठाम विश्वास आहे.  
               विषय खूप निकडीचा आहे मनोगत च्या माध्यमातून काही समविचारी मंडळींशी चर्चा करण्याचा माझा मानस आहे माझा प्रतिनिधी कार्यक्षम असण्या साठी" मी  एक मतदार म्हणून काय करू शकतो "या विषयी माझे विचार मी क्रमश : व्यक्त करेन दरम्यान वेळोवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक  उत्तरे. देण्याचा माझा प्रयत्न असेल. माधव.