भगवान

एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोटी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दींतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत,? त्या व्यक्तीने सांगितले की, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. हे ऐकून फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावर एक राजबिंडा तरुण आला. त्याच्याबरोबर हजारो लोक त्याच्याबरोबर गेले. त्याला पाहून त्या फकिराने विचारले, हेच का ते भगवान.? ती व्यक्ती म्हणाली, नाही, हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्याच्यांमागे जात आहेत........ याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहत मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणी त्या रस्त्यावर कोणीच राहिले नाही. फक्त तो एकटा फकीरच तेथे उभा होता. नंतर त्या रस्त्यावरून एक म्हातारा एकटाच आला, फकिराने त्याला विचारले आपणच भगवान का? तो म्हातारा म्हणाला हो मीच भगवान. मग फकिराने विचारले मग आपल्यामागून कोणीच कसे नाही?,डोळ्यात अश्रू आणत म्हातारा म्हणाला सारे राम, येशू..... याच्यांबरोबर निघून गेले.

"जो कोणाबरोबर जात नाही तोच माझ्याबरोबर येऊ शकतो".