कळसुबाई नळीच्या वाटेने

कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता.  शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारदऱ्याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला.  नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको.  असो.

आम्ही मात्र ठाण्याहुन ३१ तारखेला पहाटे ४.३० ला तवेरा घेऊन निघालो, आमचे काही मित्र आम्हाला आंबेवाडी या पायथ्याच्या गावात सोडुन पुढे एम.टी.डी.सी.त जाणार होते, आणि ट्रेक झाल्यावर शुध्दीत असलेले आम्हाला घ्यायला येणार होते.  साधारण ७.१५ ला आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वर आम्ही गाडी सोड्ली, कारण आमचे लक्श असलेली कळसुबाई (असलेली नव्हे असलेला) आणि त्याबाजुला असलेली नळीची वाट अगदी स्पष्ट दिसत होती. 

आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वरुन कळसुबाई
दुवा क्र. १ a="">दुवा क्र. २दुवा क्र. ३

आम्हाला आंबेवाडीत सोडायला आलेले काही मित्र
दुवा क्र. ४ a="">दुवा क्र. ५दुवा क्र. ६

मित्रांचा निरोप घेऊन निघालो आणि अगदी जवळच दिसत असलेल्या आंबेवाडीला कुशीत घेतलेल्या या  भिमकाय, अजस्त्र, अबब (काहीही म्हणा हो) दुर्ग त्रिकुटाचा फ़ोटो काढायचा मोह अनावर झाला. 

अर्थातच अलंग, मदन, कुलंग
दुवा क्र. ७ a="">दुवा क्र. ८दुवा क्र. ९

भिमकाय मदन
दुवा क्र. १० a="">दुवा क्र. ११दुवा क्र. १२

आम्ही जात असलेली वाट पश्चिमेकडुन असल्याने कळसुबाईच्या मागुन येत असलेली सुर्यकिरणे मजेशीर दिसत होती.
दुवा क्र. १३ a="">दुवा क्र. १४दुवा क्र. १५

नळीला सुरुवात होते त्या ठिकाणी तासभरात पोहोचु असा अंदाज होता, पण ही वाट आजुबाजुच्या एक-दोन डोंगरांना वळसा घालत, थोडी आंबेवाडीच्या दिशेने, एखाद दोन टेकाडांच्या वरुन जात होती. 

दुवा क्र. १६ a="">दुवा क्र. १७दुवा क्र. १८

शेवटी ९.३० च्या सुमारास नळीपाशी पोहोचलो.  नळी म्हणजे काय हो मोठ मोठ्या दगडधोंड्यांनी भरलेली पाण्याची वाट्च ती. या ठिकाणाहुनच पाणी खाली ऊडी घेते (असाच ऊल्लेख श्री. आनंद पाळंदे यांच्या "डोंगरयात्रा" मध्ये आहे)

दुवा क्र. १९ a="">दुवा क्र. २०दुवा क्र. २१

दुवा क्र. २२ a="">दुवा क्र. २३दुवा क्र. २४

तिथुन कळसुबाई अगदी अस्पष्ट दिसत होता, लगेच क्लिकून टाकलं कारण एकदा का नळी चढायला सुरुवात केली की वरती पोहोचेपर्यंत कळसुबाई दिसेलस वाट्त न्हवतं.

अस्पष्ट दिसणारा कळसुबाई
दुवा क्र. २५ a="">दुवा क्र. २६दुवा क्र. २७

नळी प्रवेश - कळसुबाई गायब
दुवा क्र. २८ a="">दुवा क्र. २९दुवा क्र. ३०

दुवा क्र. ३१ a="">दुवा क्र. ३२दुवा क्र. ३३

या दगडधोंड्यांच्या वाटेत देखील निसर्ग मधुनच आपली किमया दाखवत होता.

दुवा क्र. ३४ a="">दुवा क्र. ३५दुवा क्र. ३६

दुवा क्र. ३७ a="">दुवा क्र. ३८दुवा क्र. ३९

एके ठिकाणी तर दगडावरील शेवाळे वाळुन त्याचे छान डिझाईन झाल होत.
दुवा क्र. ४० a="">दुवा क्र. ४१दुवा क्र. ४२

वाटेत काही ठिकाणी सोपे कातळ्टप्पे होते तर काही ठिकाणची वाट अजस्त्र शिळांनी बंद झाली होती.
दुवा क्र. ४३ a="">दुवा क्र. ४४दुवा क्र. ४५

दुवा क्र. ४६ a="">दुवा क्र. ४७दुवा क्र. ४८

आतापर्यंत केलेली तासभराची चढाई ही साधारण अशा प्रकारे होती.
दुवा क्र. ४९ a="">दुवा क्र. ५०दुवा क्र. ५१

दुवा क्र. ५२ a="">दुवा क्र. ५३दुवा क्र. ५४

चालायला सुरुवात करुन तीन तास होऊन गेले, कुठून आलो ती वाट दिसत न्हवती, जिथे जायचय़ ती जागाही दिसत न्हवती, नळी अजुन किती आहे याचा अंदाज येत न्हवता, केवळ दोन्ही बाजूचे डोंगर जवळ जवळ येत आहेत म्हणजे नळी आता संपेल या आशेवर जात होतो. 
दुवा क्र. ५५ a="">दुवा क्र. ५६दुवा क्र. ५७

दुवा क्र. ५८ a="">दुवा क्र. ५९दुवा क्र. ६०

एकेठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो, जवळ्चे तहान लाडु-भूक लाडु खाल्ले, पाणी प्यायले आणि निघालो.

दुवा क्र. ६१ a="">दुवा क्र. ६२दुवा क्र. ६३

नळी संपायची चिन्ह दिसायला लागली, सुर्यप्रकाश वाढायला लागला आणि थोड्याच वेळात आम्ही नळी पार करुन वरती आलो.

दुवा क्र. ६४ a="">दुवा क्र. ६५दुवा क्र. ६६

दुवा क्र. ६७ a="">दुवा क्र. ६८दुवा क्र. ६९

दुवा क्र. ७० a="">दुवा क्र. ७१दुवा क्र. ७२

डावीकडे असलेल्या कळसुबाईचे सुखद दर्शन झाले.

दुवा क्र. ७३ a="">दुवा क्र. ७४दुवा क्र. ७५

दुवा क्र. ७६ a="">दुवा क्र. ७७दुवा क्र. ७८

कळसुबाईच्या अत्युच्च्य टोकावर जायला अजुन अर्धा तास तरी लागणारच होता.  पण बरेच दिवसांनी ट्रेकला जात असल्याने सवय मोडलेली, त्यात पहाटे लवकर निघालेलो, दिवसभरात खाणही तसं विशेष झालं न्हवत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणुन की काय पायात क्र्यम्प यायला लागले, आणि अर्धा तासाच्या अंतराला पाऊणतास लागला.  शेवट्च्या शिडीपाशी आलो,

दुवा क्र. ७९ a="">दुवा क्र. ८०दुवा क्र. ८१

आणखी पाच मिनीटातचं कळसुबाईच्या देवळापाशी पोचलो.
दुवा क्र. ८२ a="">दुवा क्र. ८३दुवा क्र. ८४

दुवा क्र. ८५ a="">दुवा क्र. ८६दुवा क्र. ८७

आजुबाजुच्या परिसराचे फोटो काढले
दुवा क्र. ८८ a="">दुवा क्र. ८९दुवा क्र. ९०

दुवा क्र. ९१ a="">दुवा क्र. ९२दुवा क्र. ९३

दुवा क्र. ९४ a="">दुवा क्र. ९५दुवा क्र. ९६

आमच्या बरोबर पुर्वी काही ट्रेक केलेले जुने मित्र ऐन देवळातच भेटले, मग काय जुन्या आठवणी, गमती-जमती यात थोडा वेळ घालवला. 
दुवा क्र. ९७ a="">दुवा क्र. ९८दुवा क्र. ९९

त्यांचा निरोप घेऊन निघालो कारण ते बारी गावात ऊतरणार होते, आणि कळसुबाई सगळ्या वाटांनी करायचा अस ठरवलं असल्याने आम्ही ईंदोरे नावाच्या एका लांबच्या वाटेने परतणार होतो.  जवळच असलेल्या विहीरीतुन पाणी भरुन घेतलं, तिथेच एका मामाने आता खोपटी वजा दुकान टाकलं आहे, मामाकडेच गरमागरम खेकडा भजी खाल्ली, चहा प्यायला, त्यामधे खाण्यापेक्षा ईंदोरे गावची वाट विचारुन घेण हाही एक ऊद्देश होता.  "बारीची जवळची वाट सोडुन लांबच्या वाटेने कशापायी जाता" इती मामा.  आम्ही अर्थातच त्याकडे दुर्लक्ष केल आणि निघालो. 

ईंदोरे गावच्या वाटेवरुन
दुवा क्र. १०० a="">दुवा क्र. १०१दुवा क्र. १०२

साधारण पाऊण तासाच्या चालीनंतर एके ठिकाणी एकदम तुटलेला कडाच आला, पण त्याच्या बाजुनेच खाली ऊतरायला दगडी पायऱ्या देखील होत्या.  साधारण १०० एक पायऱ्या असाव्यात.

दुवा क्र. १०३ a="">दुवा क्र. १०४दुवा क्र. १०५

एके ठिकाणी तर लोखंडी साखळी सुध्दा लावलेली होती, पण ती मधेच तुटली असल्याने आम्ही अर्थातच पायऱ्यांवरुन गेलो.
दुवा क्र. १०६ a="">दुवा क्र. १०७दुवा क्र. १०८

दगडात कोरलेल्या पारऱ्या
दुवा क्र. १०९ a="">दुवा क्र. ११०दुवा क्र. १११

तीन तास ऊतरुन पायथ्याच्या ईंदोरे गावात पोहोचलो तेव्हा पाय मी म्हणायला लागले होते, वाटेत मोबाईलला रेंज मिळाल्यामुळे मित्रांना निरोप पाठवला होता ते सुध्दा वेळेत आले आणि ५ च्या सुमारास भंडारदरा एम.टी.डी.सी.त पोचलो, आणि दोन्ही उद्दीष्ट साध्य झाल्याने समाधान पावलो.

भंडारदरा, मागील रांगेत रतनगड आणि खुटा
दुवा क्र. ११२ a="">दुवा क्र. ११३दुवा क्र. ११४